price onion soybean cotton and farm producers | शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात! शेतमालाला किती मिळतोय भाव? - डिजिटल शेतकरी

price onion soybean cotton and farm producers | शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात! शेतमालाला किती मिळतोय भाव?

price onion soybean cotton and farm producers: दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील काही बाजार समित्या बंद तर अनेक बाजार समित्यांमध्ये मुहूर्ताची खरेदी झाली आहे. यावेळी खरिपाच्या कापूस, सोयाबीन, कांदा, तूर अशा उत्पादनांची आवक झाली होती तर दिवाळीनिमित्ताने झेंडूचीही आवक झाली होती  काल बाजारभाव स्थिर असल्याचं चित्र होतं. दिवाळीत तरी चांगला दर मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचा माल साठवून ठेवला होता आणि पण दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.price onion soybean cotton and farm producers

दरम्यान, दसऱ्याच्या तुलनेत काल झेंडूला चांगला दर मिळाला. पुणे बाजार समितीत ९५६ क्विंटल झेंडूची आवक झाली होती. तर ४ हजार रूपये प्रतिक्विंटल ते ८ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे तसेच सोयाबीनचा विचार केला तर मागच्या काही दिवासांपासून सोयाबीनच्या दरात जास्त वाढ झाल्याचं चित्र नाही. ४ हजार ४०० ते ५ हजारांपर्यंत सरासरी दर मिळताना दिसत आहे. काल वरोरा  बाजार समितीत ३ हजार रूपये एवढा सर्वांत कमी किमान दर मिळाला तर परभणी बाजार समितीत ५ हजार ५० रूपये एवढा दर मिळाला.

price onion soybean cotton and farm producers

मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळले आहेत नि ७ हजारांवर गेलेले कांद्याचे दर आता २ ते ३ हजारांवर येऊन ठेपले आहेत. तर काल ३०० रूपये ते ४ हजार २०० रूपयांपर्यंत किमान तर २ हजार ५०० ते ५ हजार ५०० रूपयांपर्यंत कमाल दर कांद्याला मिळाला. सरासरी दर हे १ हजार ४०० ते ५ हजारांच्या दरम्यान होते. तर कापसांच्या दरातही जास्त हालचाल दिसून आली नाही तसेच ७ हजार ते ७ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल दराने कापसाची विक्री होताना दिसत आहे.

मागच्या एका महिन्यापासून कोणत्याच शेतमालाला चांगला दर मिळताना दिसत नाही आणि कांदा, सोयाबीनचेही दरही केंद्र सरकारने दाबून ठेवले आहेत. कांद्यावरील निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कात वाढ करून मोठ्या धक्का शेतकऱ्यांना दिला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य स्थिती आहे, पण केवळ ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच तर अनेक शेतकऱ्यांना पीकविमा अग्रीमची रक्कमही मिळाली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळीही अंधारातच गेली गेली आहे.price onion soybean cotton and farm producers

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समिती. जात/प्रत. परिमाण. आवक. कमीत कमी दर. जास्तीत जास्त दर. .सर्वसाधारण दर.
13/11/2023
चंद्रपूर क्विंटल 115 4800 5035 4960
सिल्लोड क्विंटल 40 4800 4900 4850
परभणी लोकल क्विंटल 645 4900 5050 5000
वरोरा पिवळा क्विंटल 285 3000 4900 4400
घणसावंगी पिवळा क्विंटल 210 4800 4900 4800

 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
13/11/2023
उमरेड लोकल क्विंटल 44 6940 7050 7000
वरोरा लोकल क्विंटल 462 7000 7200 7100

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर 

बाजार समिती. जात/प्रत. परिमाण. आवक. कमीत कमी दर. जास्तीत जास्त दर. सर्वसाधारण दर.
13/11/2023
बारामती लाल क्विंटल 141 1500 4350 3500
जळगाव लाल क्विंटल 375 1575 4177 3200
पुणे लोकल क्विंटल 4308 2500 4600 3550
पुणे- खडकी लोकल क्विंटल 2 3500 3500 3500
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 4200 4200 4200
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 69 2600 3600 3000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 270 300 2500 1400
मंगळवेढा लोकल क्विंटल 83 700 4500 3600
कल्याण नं. १ क्विंटल 3 4000 5500 5000
नाशिक उन्हाळी क्विंटल 516 3300 4511 4000

Web Title: maharashtra farmer diwali festival market yard rate price onion soybean cotton and farm producers

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी कसा कराल अर्ज?

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment